IAS Kumar Ashirwad: CM फडणवीसांनी सोलापूरहून थेट नागपूरला नेलेले लाडके IAS अधिकारी कुमार आशीर्वाद 'कलेक्टर' का झाले? वाचाच...

Deepak Kulkarni

IAS अधिकारी

कुमार आशीर्वाद हे 2016 च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

IAS Kumar Ashirwad Transfer | Sarkarnama

नागपूरचे नवीन जिल्हाधिकारी

कुमार आशीर्वाद यांची 2 एप्रिल 2026 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी बदली करण्यात आली आहे. ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.

IAS-Kumar-Ashirwad-Story | Sarkarnama

धडाकेबाज अधिकारी

आयआयटी खरगपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकची पदवी मिळवलेल्या कुमार यांची ओळख ही एक कर्तव्यनिष्ठ,शिस्तप्रिय आणि जनसामान्यांच्या हिताकरिता कठोर निर्णय घेणारे धडाकेबाज अधिकारी म्हणून राहिली आहे.

IAS-Kumar-Ashirwad-Story | Sarkarnama

पाच दिवस पूरग्रस्तांसोबत

सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना महापुराच्या आपत्कालीन परिस्थितीत ते चार-पाच दिवस पूरग्रस्तांसोबत राहिले. त्यांच्या व्यथा जाणून घेत तातडीची मदत, नियोजनबद्ध उपाययोजना व संवेदनशील निर्णयामुळे जीवितहानी होण्यापासून वाचण्यात यश आले होते.

IAS-Kumar-Ashirwad-Story | Sarkarnama

‘गुडबूक’मधील अधिकारी

कुमार आशीर्वाद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबूक’मधील अधिकारी मानले जात होते. त्यांची आता मुख्यमंत्र्यांनी स्वजिल्ह्यातच बदली केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला नागपूरला नेलेच, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

IAS-Kumar-Ashirwad-CM Devendra Fadnavis | Sarkarnama

प्रेरणादायी कहाणी

IAS अधिकारी कुमार आशीर्वाद यांची यूपीएससीपर्यंतच्या प्रवासाची कहाणी फार प्रेरणादायी राहिली आहे.

IAS-Kumar-Ashirwad-CM Devendra Fadnavis | Sarkarnama

वडिलांची धावपळ...

त्यांच्या वडिलांचं शेतीसंदर्भातलं एक काम प्रशासकीय कार्यालयांचे वारंवार उंबरठे झिजवूनही मार्गी लागत नव्हते. यामुळे वडील प्रचंड चिंताग्रस्त होते. वडिलांची धावपळ,अपयश बघून कुमार यांना बैचेन करत होतं.

IAS-Kumar-Ashirwad | Sarkarnama

तात्काळ काम मार्गी

पण वडिलांना या कामानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत कलेक्टरची भेट घेतली. या एकाच भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी वडिलांच्या कामाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे दिरंगाईबाबत चौकशी करत तात्काळ काम मार्गीही लावले.

IAS-Kumar-Ashirwad | Sarkarnama

आयुष्याची दिशा ठरली

काम मार्गी लागल्यानंतर घरी परतलेल्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद अन् डोळ्यात तरळणारे आनंदाश्रू बघून कुमार आशीर्वाद यांच्या आयुष्याची दिशा निश्चित झाली होती.

IAS-Kumar-Ashirwad | Sarkarnama

'पण' पूर्ण केला...

आयएएस अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मनात त्याचवेळी विचार आला की, जे काम कुणालाही जमत नाही, ते जिल्हाधिकारीच त्यांची सगळी पॉवर वापरुन एका झटक्यात मार्गी लावू शकतात... त्याक्षणी त्यांनी कलेक्टरच व्हायचं असा निश्चय केला आणि तो पूर्णत्वासही नेला.

IAS-Kumar-Ashirwad | Sarkarnama

NEXT: केजरीवालांचे विश्वासू ते राज्यसभेत बिनविरोध एन्ट्री : 'आप'नेच आवाज दाबलेल्या राघव चड्ढा यांची हिस्ट्री...

Raghav-Chadha-Rajya-Sabha-AAP-removed (1).jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...