Roshan More
नागपूरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी कांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले.
कर्जमाफीबाबत ते म्हणाले, कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही एक जुलैपर्यंत कर्जमाफीची योजना काय असेल? याबाबत आम्ही घोषणा करू
शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना तसेच त्यांना दिलेले पॅकेजवर याी माहिती मुख्यमंत्र्यांनी सादर केले. 32 हजार कोटींचे पॅकेज त्यांनी घोषित केले.
पुढील दोन वर्षात राज्यात एक लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
राज्यात झालेल्या गुंतवणुकीपैकी विदर्भात तब्बल 20 हजार कोटींची गुंतवणूक आल्याचे त्यांनी सांगितले.
परकीय गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र नंबर वन असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आरोप होत आहे. त्यावर चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील, असे त्यांनी सांगितले.
आर्थिकस्थिती चांगली स्थूल उत्पन्नाच्या 25 टक्के कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे असते मात्र महाराष्ट्र त्याच्या खाली आहे. स्थूल उत्पन्नाच्या 18.87 टक्के एवढेच कर्ज घेतलेले आहे.