Jagdish Patil
नागपुरातील संघ मुख्यालयात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बौद्धिकाचे आयोजन केलं होतं.
याच पार्श्वभीमीवर या बौद्धिकाला महायुतीतील भाजप आणि शिवसेना पक्षाच्या कोणकोणत्या नेत्यांनी हजेरी लावली. ते जाणून घेऊया.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील संघ मुख्यालयात आले होते.
यावेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली अर्पण करत विनम्र अभिवादन केलं.
मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संघ मुख्यालयात हजेरी लावली.
यावेळी त्यांनी, संघसंस्थापकांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेताना राष्ट्रसेवा, शिस्त, त्याग आणि संस्कारांची परंपरा अधिक ठळकपणे जाणवल्याची भावना व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंसोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मंत्री संजय शिरसाट, भरतशेठ गोगावले, संजय राठोड उपस्थित होते.
तसंच शिवसेना नेते तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री दादा भुसे यांनी देखील हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.