Pradeep Pendhare
अहिल्यानगरच्या शिर्डी इथं संरक्षण दलाच्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे.
या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून शिर्डीला वंदे भारत ट्रेनने प्रवास करत हजेरी लावली.
वंदे भारत ट्रेनमध्ये आल्याने अनेक लोकांच्या भेटीबरोबरच, प्रवासात अनेक फाईल्सवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काम केलं.
ट्रेनमधील प्रवासात वृत्तपत्र वाचनाबरोबर, हा अनुभव अत्यंत लाभदायी वाटल्याचा अभिप्राय मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवला.
जगातल्या विकसित राष्ट्राप्रमाणे वंदे भारत ही ट्रेन आहे, असा अनुभव मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिर्डीत उतरताच दिला.
देश संरक्षणासाठी उत्पादन शिर्डी होत असल्यानं, भक्तीचं केंद्र शिर्डी आता शक्तीचं केंद्र बनतंय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
शांतता तेच प्रस्थापित करू शकतात जे शक्तिमान असतात, दुर्बल व्यक्ती कधीच शांतता प्रस्थापित करू शकत नाही, असेही मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवलं.