सरकारनामा ब्यूरो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या 184 व्या जयंतीनिमित्त सातारा येथील शिरवळ आणि नायगाव या दोन ठिकाणांना भेट देत सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी गुलाबाचे फुल देऊन साताऱ्यातील शिरवळ येथे स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री शिरवळ दौर्यादरम्यान गेले असता येथे लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधत स्वागत केले.
दौर्यादरम्यान आमदार छगन भुजबळ,भाजप मंत्री पंकजा मुंडे यावेळी मुख्यमंत्र्यांंबरोबर उपस्थित होते.
सातारा दौर्यादरम्यान शिरवळ येथे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचीही भेट घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा येथील नायगाव येथेही उपस्थिती लावत सावित्रीबाईंच्या स्मारकाला अभिवादन केले.
मुख्यमंत्र्यांनी नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळाला भेट देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी त्यांनी उपस्थितांसह सगळ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची मूर्ती,पुस्तक भेट म्हणून दिले.
आमदार छगन भुजबळ,पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर अशा अनेक मंत्र्यांची यावेळी उपस्थिती होती.
देशातील 'या' रेल्वे स्थानकांवरून तुम्ही जाल थेट परदेशात