Aslam Shanedivan
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.
ते आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भातील आढावा बैठकीसाठी येथे आले आहेत.
यावेळी ते नाशिकमधील काही ठिकाणांना भेट देण्याची शक्यता असून त्यांनी येथील त्र्यंबकेश्वराला भेट दिली
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दर्शन घेतले
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं परिधान केले होतं
पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरण्यातील त्यांचा लूक सध्या चर्चेचा विषय ठरला असून यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे ही उपस्थित होते
यावेळी फडणवीस यांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी अभिषेक आणि महापूजा केली.