Amruta Fadnavis News: सीएम फडणवीसांच्या मुलीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल; म्हणाली,'मी ओळखत असलेल्या सर्व स्त्रियांमध्ये...'

Deepak Kulkarni

CM फडणवीसांच्या पत्नी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असलेल्या अमृता फडणवीस यांची ओळख एक माजी प्रसिद्ध बँकर, शास्त्रीय गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

Divija Fadnavis And Amruta Fadnavis | Sarkarnama

वाढदिवस

अमृता फडणवीस यांचा गुरुवारी (ता.9 एप्रिल) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

Amruta Fadnavis | Sarkarnama

MBA पर्यंतचं शिक्षण

अमृता फडणवीस या माहेरचं आडनाव रानडे असून त्यांचा जन्म 9 एप्रिल 1979 रोजी झाला. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी (MBA) पर्यंतचं शिक्षण घेतलेलं असून 2003 मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून ॲक्सिस बँकेत कारकीर्द सुरू करून, त्यांनी वरिष्ठ उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली होती.

Divija Amruta Fadnavis Devendra Fadnavis | Sarkarnama

कन्या दिविजाच्या हटके शुभेच्छा

आई अमृता फडणवीसांच्या वाढदिवसादिवशी मुख्यमंत्र्यांची कन्या दिविजाने आईला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. दिविजाने सोशल मीडियावर आईसाठी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Divija Amruta Fadnavis Devendra Fadnavis | Sarkarnama

सुरेख व भावनिक पोस्ट

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या कन्या दिविजाने सोशल मीडियावर आईसाठी एक अतिशय सुरेख व भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Divija Amruta Fadnavis Devendra Fadnavis | Sarkarnama

खास फोटो शेअर

दिविजाकडून सोशल मीडियावरील तिच्या या भावनिक पोस्टसह आईसोबतचे काही अनमोल क्षण आणि खास फोटो शेअर केले आहेत.

Divija Amruta Fadnavis Devendra Fadnavis | Sarkarnama

पहिली गुरू

दिविजा तिच्या पोस्टमध्ये म्हणते की, मी ओळखत असलेल्या सर्व स्त्रियांमध्ये सर्वांत खंबीर, श्रेष्ठ आणि खऱ्या असलेल्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू माझी पहिली गुरू आणि माझी आजवरची सर्वांत चांगली मैत्रीण आहेस. तू अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेस आणि तरीही तू मी पाहिलेली सर्वांत गोड आणि दयाळू व्यक्ती आहेस,असंही दिविजा फडणवीसांनी म्हटलं आहे.

Divija Amruta Fadnavis Devendra Fadnavis | Sarkarnama

खूप अभिमान

मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान वाटतो आणि मला आशा आहे की, येणाऱ्या प्रत्येक जन्मात आपली भेट अशीच होत राहो, अशी भावना तिने व्यक्त केली. तसेच घर ही केवळ एक वास्तू नसते; तर ती एक व्यक्ती असते आणि माझ्यासाठी ते घर नेहमीच माझी मम्मा’ राहिल्याचंही मुख्यमंत्र्यांच्या कन्येनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Divija Amruta Fadnavis Devendra Fadnavis | Sarkarnama

NEXT : दर 100 रुपयांच्या तिकिटामागं जादा 10 रुपये मोजावे लागणार; नेमकी कशी असणार प्रवाशांसाठी एसटीची हंगामी दरवाढ ?

ST-Bus-Ticket.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...