ST Bus Ticket: दर 100 रुपयांच्या तिकिटामागं जादा 10 रुपये मोजावे लागणार; नेमकी कशी असणार प्रवाशांसाठी एसटीची हंगामी दरवाढ ?

Deepak Kulkarni

प्रवाशांसाठी मोठी अपडेट

राज्यात आता उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासह नातेवाईकांकडे किंवा गावी जाण्याबाबतचे प्लॅन आखले जात आहे. याच दरम्यान, प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

हंगामी दरवाढ

एसटी महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही तिकीट दरात हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

15 एप्रिलपासून नवी दरवाढ लागू

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून येत्या 15 एप्रिलपासून नवी दरवाढ लागू केली जाणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामातच ही वाढ केल्यानं सर्वसामान्यांना त्याची मोठी झळ सोसावी लागणार आहे.

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

10 टक्के वाढ

एसटी महामंडळानं यंदा तिकीट दरात 10 टक्के वाढ जाहीर केली आहे.

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

दरवाढीचा निर्णय

एसटी प्रवाशांना आता प्रत्येक तिकीट दरासाठीच्या 100 रुपयांवर 10 रुपये जादा मोजावे लागणार आहे. सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांची गर्दी पाहता महामंडळ दरवाढीचा निर्णय घेत असते.

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

15 जूनपर्यंत दरवाढ

15 एप्रिलपासून लागू करण्यात येणारी एसटी प्रवासासाठीची दरवाढ 15 जूनपर्यंत कायम असणार आहे. 

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

लालपरीसाठी वाढ

ही दरवाढ लाल परीसह जलद बसेससाठीच लागू असणार असल्याचं एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे.

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

'या' बसेसला वाढ नाहीच...

यात महत्त्वाची बाब म्हणजे एसटी महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी यांसह इतर स्लीपर कोच बसेसच्या तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

सवलत सुरू राहणार

एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या महिलांना 50 टक्के तिकीट सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी मोफत प्रवास सवलत या काळात सुरू राहणार आहे.

ST Bus Ticket Hike | Sarkarnama

NEXT: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप; काँग्रेसचा बडा नेता गायब...

Pawan Khera case assam, Riniki Bhuyan Sharma allegations : | Sarkarnama
येथे क्लिक करा...