Amol Sutar
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासकामांचे काल भूमिपूजन झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन पार पडले.
यावेळी मंत्री दिलीप वळसे - पाटील, आमदार राहुल कुल, महेश लांडगे व अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आणि परिसराच्या विकासकामांतर्गत कामे करण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांचे 60 ते 65 फुट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प उभारण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जीएफआरसी तंत्रज्ञानावर आधारित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटाची व साहित्याची माहिती दर्शविणारी भित्तीचित्रे साकारली जाणार आहेत.
त्याचबरोबर संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय कक्ष, सभागृह आणि स्मरणिका दुकाने उभारण्याच्या कामाचा विकास आराखड्यात समावेश आहे.
त्याचबरोबर 250 मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा साकारण्यात येणार आहे.
भिमा नदीच्या घाटाचा विकास करणे, बोटीचे फलाट विकसीत करणे अशी कामे विकास आराखड्यात नमूद करण्यात आली आहेत.
NEXT : Kripashankar Singh : मुंबई काँग्रेस अध्यक्ष ते भाजपचे लोकसभा उमेदवार; 'असा' आहे कृपाशंकर सिंह यांचा राजकीय प्रवास