Amol Sutar
डोंबिवली येथे कल्याण शीळ मार्गावरील प्रीमियर कंपनी मैदानावर श्री बालाजी - भूदेवी आणि श्रीदेवी यांचा पारंपरिक विवाह सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब हजेरी लावली.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिरुपती बालाजी देवस्थान येथील पूजेची श्री बालाजी यांची मूर्ती आणण्यात आली होती.
तिरुमला तिरुपती देवस्थान आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून डोंबिवलीत दुसऱ्यांदा श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने भक्तांना डोंबिवलीत बालाची यांचे दर्शन तसेच विवाह सोहळा प्रत्यक्ष पाहता आला अशी भावना यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे, दादा भुसे, गिरीश महाजन यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
व्यंकटेश सुप्रभातम् स्तोत्राच्या अत्यंत पवित्र शब्दोच्चारणात श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाला रविवारी सकाळी भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
श्री बालाजी आणि महालक्ष्मी यांच्या पारंपारिक विवाह सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.