Raju Shetti : शेतकऱ्यांसाठी जीव धोक्यात घालणारा नेता ते खासदार : राजू शेट्टी

Vijaykumar Dudhale

शिरोळ येथे जन्म

राजू शेट्टी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे 1 जून 1967 रोजी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सांगली जिल्ह्यातील बगाणी विद्यालयात झाले.

Raju Shetti | Sarkarnama

शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली लढा

शेतकरी संघटनेत (स्व) शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत होते.

Raju Shetti | Sarkarnama

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना

शरद जोशी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली.

Raju Shetti | Sarkarnama

जिल्हा परिषद निवडणूक

राजू शेट्टी यांनी 2001 मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक उदगाव गटातून लढवली आणि जिंकली.

Raju Shetti | Sarkarnama

आमदार

विधानसभेची 2004ची निवडणूक राजू शेट्टी यांनी अपक्ष म्हणून शिरोळ मतदारसंघातून लढली. त्या निवडणुकीत त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला.

Raju Shetti | Sarkarnama

खासदार

लोकसभेची 2009 ची निवडणूक राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून लढवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांचा पराभव केला.

Raju Shetti | Sarkarnama

कलाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव

राजू शेट्टी यांनी 2014 मध्ये एनडीएसोबत युती केली. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी ज्येष्ठ नेते कलाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव केला.

2019 मध्ये पराभव

राजू शेट्टी यांनी 2019 ची निवडणूक महाआघाडीसोबत लढली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा धैर्यशील माने यांनी पराभव केला.

Raju Shetti | Sarkarnama

युवती सेनेचा निर्धार मेळावा,'आता वेळ आली महाराष्ट्राचा सन्मान अन् स्वाभिमान जपण्याची!'

Shivsena Yuvati Melava | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा