Jagdish Patil
पश्चिम उपनगरांमधील वाहतूक जलद होण्यासाठी महत्वाचा असणारा कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.
या मार्गाचे उद्घाटन गुरुवारी (ता. 12 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
या पुलामुळे नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणे शक्य होणार असल्याचं CM शिंदेंनी सांगितलं.
या पुलाची लांबी 136 मीटर असून रुंदी 18 मीटर एवढी आहे, तर उंची 29.5 मीटर एवढी आहे.
हा पूल बांधताना कोळी बांधवांनी 2 खांबातील रूंदी जास्त ठेवण्याची विनंती केली होती, त्यानुसार पुलाच्या संरचनेत बदल करून ही लांबी वाढवण्यात आली.
त्यामुळे कोळी बांधवांनी खास त्यांची ओळख असलेली टोपी घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करत शासनाचे आभार मानले.
यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून कोस्टल रोडची सफर केली.
कोस्टल रोडची पाहणी करताना फडणवीसांनी स्वत: गाडीचं सारथ्य केलं. त्यांच्या शेजारी CM शिंदे बसले होते.