Jagdish Patil
नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरणामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
बावनकुळेंचा मुलगा संकेत याच्या भरधाव ऑडी कारने काही गाड्यांना धडक दिल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे.
रविवारी संकेत आणि त्याचे दोन मित्र अर्जून हावरे आणि रोनित चिंतमवार हे लाहोरी हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्री ते ऑडी मोटारीतून बाहेर पडले.
त्यानंतर सेंट्रल बाजार रोडवरुन भरधाव जात असताना सेंटर पॉईंट हॉटेलसमोर त्यांनी जीतू सोनकांबळे याच्या मोटारीसह 3 वाहनांना धडक दिली.
'ऑडी'कार अपघाता'वरून शिवसेना ठाकरे गटाने BJP वर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत आणि सुषमा अंधारे रोज नवे-नवे खुलासे करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
मात्र, आता काँग्रेसच्या संयमाचं कारण पुढं आलं आहे. कारण संकेतची ऑडी चालवणारा अर्जुन हावरे हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे.
अर्जुनचे वडील जितेंद्र ऊर्फ अंतू हावरे हे शहर काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष होते. त्यामुळेच नागपूर हिट अण्ड रन प्रकरण भाजप व्हाया काँग्रेसकडे जाताना दिसत आहे.