सरकारनामा ब्यूरो
नववर्षाच्या पहिल्याच दिवसाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले अनोखे स्वागत.
मुंबईचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी सहकुटूंब दर्शन घेतले.
प्रत्येक गोष्टीची सुरुवात श्री गणरायाच्या दर्शनाने होत असते म्हणून नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्याच आशीर्वादाने केली.
दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेत राज्यातील जनतेसाठी देवाकडे प्रार्थना केली.
'राज्याला कोणतीही अडचण न येता सर्वांगीण विकासाची नवी क्षितिजे सहज सर करणे शक्य होणार' असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे.
कुटुंबातील सदस्यांमध्ये एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे, सून आणि नातू उपस्थित होते.
संपूर्ण शिंदे कुटूंबासह आमदार सदा सरवणकर हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली आहे.