सरकारनामा ब्यूरो
राजस्थानमधील बिकानेर येथे राहणारे प्रेमसुख देलू हे शेतकरी कुटुंबातील आहेत.
देलू यांनी रात्रंदिवस मेहनत करून पटवारी परीक्षा उत्तीर्ण केली.
पदवीनंतर त्यांनी पटवारी भरतीसाठी अर्ज केला होता.
प्रचंड मेहनत करुन ते पटवारी झाले. त्यानंतरही त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते आयपीएस झाले.
पटवारी म्हणून काम करताना त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आणि नेटची परीक्षा उत्तीर्ण केली.
नेटची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रेमसुख यांनी इतिहास विषयात UGC NET आणि JRF परीक्षाही उत्तीर्ण केली.
त्यांचे वडील व्यापाऱ्यांचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी उंटगाडी चालवत असत.
बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अधिकारी व्हायचं ठरवलं होतं.
मोठा भाऊ राजस्थान पोलिसात हवालदार असल्याने त्यांनीच प्रेमसुख यांना स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा दिली होती.