सरकारनामा ब्यूरो
वरळी ते मरीन ड्राइव्ह केवळ 10 मिनिटांत पार करता येणारा कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत या रोडचे अखेर उद्घाटन झाले.
हा दिवस मुंबईकरांसाठी महत्त्वाचा तसेच ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
मुंबईत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याने संपूर्ण शहरवासीयांसाठी ही आनंदाची बाब आहे.
आठ मार्ग असलेला हा कोस्टल रोड 10.58 किमीचा आहे, तर बोगद्यातूनही हा मार्ग असणार आहे.
वेळ आणि इंधनाच्या बचतीसोबतच ध्वनी आणि वायू प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.
जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, उद्याने यांसारख्या सुविधाजनक गोष्टींसोबतच सुरक्षित आणि जलदरित्या प्रवासही करता येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील एका लेनच्या उद्घाटनावेळी राज्य सरकारने मोठी घोषणा केली.
हा भव्य कोस्टल रोड 'छत्रपती संभाजी महाराज' यांच्या नावाने ओळखला जाणार आहे.
R