सरकारनामा ब्यूरो
एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील पिपरी बुर्गी या दुर्गम भागातील पोलिस कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, परिक्षेत्र उपमहानिरीक्षक, पोलिस अधीक्षक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमावेळी जवानांना फराळ वाटप करण्यात आले.
महिला पोलिसांनी एकनाथ शिंदेंना ओवाळून भाऊबीज साजरी केली.
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लहान मुलांना भेटवस्तू आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
"दुर्गम भागात शिक्षण, रोजगार आणि इतर सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न करू," असे मुख्यमंत्री म्हणाले.
गडचिरोलीमधील किटाळी गावातील 'सी-60' कमांडोच्या फायरिंग रेंजला भेट दिली.
नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी 'सी-60' या विशेष दलाची स्थापना करण्यात आली होती.
तेथील जवानांशी संवाद साधला आणि त्यांची कार्यपद्धती समजून घेतली.