सरकारनामा ब्यूरो
शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शिवनेरीवर जाऊन शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झाले.
शिवनेरी किल्ल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
सकाळीच त्यांचे गडावर आगमन झाले. त्यावेळी त्यांनी आसपासच्या परिसराची भ्रमंती केली.
गडावरील या सोहळ्यानंतर त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
शिवनेरीचे नैसर्गिक सौंदर्य आणि वारसा जपण्यासाठी वन विभागाच्या ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे उद्घाटन केले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची तयारी शासकीय स्तरावर काटेकोरपणे करण्यात आली होती. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्तही केला होता.
हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे स्मरण करून देतो. दरवर्षी ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर भव्यतेने आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता.
R