Sunil Balasaheb Dhumal
राज्यसभेत सोनिया गांधी, जया बच्चन, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण आदी नेत्यांची बिनविरोधत निवड झालेली आहे.
निवडणूक अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.
सात वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभा सदस्या बनल्या आहेत. त्यांची सुमारे ४८ कोटी संपत्ती आहे.
जया बच्चन यांच्याकडे दागिने, वाहने, ठेवी अशी एकूण सुमारे २५० कोटींची संपत्ती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांची एकूण 450 कोटी संपत्ती आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजप नेते अशोक चव्हाणांची एकूण 68 कोटी संपत्ती आहे.
शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी 134 कोटी संपत्ती असल्याचे घोषीत केले आहे.
जगन मोहन रेड्डी यांच्या YSRCP चे मेदा रघुनाधा रेड्डी यांची ४७५ कोटी संपत्ती आहे. तर वाई. वी. सुब्बारेड्डी यांची 118 तर गोला बाबूराव यांची चार कोटी 19 लाख संपत्ती आहे.