सरकारनामा ब्यूरो
ठाण्यातील अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे कोशाध्यक्ष गोविंदगिरी महाराज या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मंदिरातील पिंडीची त्यांनी मनोभावे पूजा केली. तसेच लोकांच्या हितासाठी प्रार्थनाही केली.
प्राचीन शिवमंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही अत्यंत अस्वच्छ होता.
मात्र आता या परिसराचा कायापालट करण्यासाठी सुमारे 140 कोटी रुपये खर्चून येथील विकास करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकाराने या मंदिराचा विकास करण्याचा निर्धार झाला आणि अखेर याचे भूमिपूजन यशस्वीपणे पार पडले.
निवारा केंद्र, ग्रीन सिटी हॉस्पिटल, यूपीएससी ट्रेनिंग सेंटर यांसारख्या अनेक कार्यक्रमाच्या लोकार्पणानंतर गोविंदगिरी महाराजांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, खासदार, आमदार तसेच शिवसेना कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
R