Amol Sutar
अभिनेता प्रसाद ओकने नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या चाहत्यांशी एक गोड बातमी शेअर केली. त्याने स्वतःचं नवीन घर घेतलं आहे.
घराची छोटीशी झलक त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. व्हिडीओमध्ये प्रसादच्या घराबाहेरील इंटिरियर फारच सुंदर सजवलेले दिसते.
प्रसाद ओकच्या नवीन घराच्या वास्तूशांतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आहे.
याबाबत पोस्ट लिहून प्रसादने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्याने त्याच्या सोशल मीडियावरून एकनाथ शिंदेंबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
प्रसादने 'धर्मवीर' या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शक आनंद दिघेंची भूमिका साकारली होती.
प्रसादच्या घराची पाटी ही रस्त्यावर किलोमीटर दर्शवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांसारखी आहे. त्यावर 1102 आणि 1103 अशा दोन फ्लॅटचे नंबर लिहिले आहेत.
कुटुंबाचा नव्या घरासमोर एक गोड फोटो प्रसादने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात प्रसाद, पत्नी मंजिरी आणि त्यांची मुलं सार्थक व मयांक आहेत.
सध्याचा मराठी सिनेसृष्टीचा आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जात आहे.
प्रसादच्या घरातील भिंतीवर 'हार्दिक शुभेच्छा' असे लिहीत मुख्यमंत्र्यांनी त्याखाली स्वाक्षरी केली. प्रसादच्या या पोस्टने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.