सरकारनामा ब्यूरो
राजस्थानच्या पाली येथे झोपडपट्टीत जन्मलेल्या उम्मुल खेर या बालपणापासूनच अपंग होत्या.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि अधिकारी पद मिळवले.
हाडांच्या नाजूक विकारामुळे उम्मुल यांची हाडे अनेकदा तुटली.
हाडांच्या विकारामुळे आत्तापर्यंत त्यांच्यावर 16 फ्रॅक्चर आणि आठ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
परिस्थितीवर मात करत उम्मूल यांनी रात्रंदिवस अभ्यास करून 10वी आणि 12वीत अव्वल गुण मिळवले.
दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून त्यांनी मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली.
जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून त्यांनी MA आणि M.Phill पूर्ण करत जेआरएफ उत्तीर्ण केले.
जपानच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झालेल्या उम्मूल या चौथ्या भारतीय ठरल्या..
JRF दरम्यान त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात 420 वी रॅंक मिळवली.