Roshan More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.
राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.
दर्शनानंतर अभिषेक झाल्यानंतर मनाला समाधान वाटते. ही वास्तू प्राचीन असून येथून सकारात्मक उर्जा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भीमाशंकराचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. दर्शनानंतर अभिषेक झाल्यानंतर मनाला समाधान वाटते.
पुजेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात राबवत असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
पुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.