Pankaj Rodekar
ठाण्याच्या खोपट एसटी डेपोत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 5150 इलेक्ट्रिक बस योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी अत्याधुनिक इलेक्ट्रिक बससेवा योजनेचे उद्घाटन केले.
प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये या ई-बसेस धावणार आहेत.
मुख्यमंत्र्यांना या नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बसमध्ये बसण्याचा मोह काही केल्या आवरला नाही.
एसटी महामंडळाने 5150 वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी राज्यभरात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर चार्जींग स्थानके निर्माण केली जात आहेत.
या प्रकल्पाची सुरूवात बोरीवली - ठाणे - नाशिक या मार्गावर या बसेस सुरू करून करण्यात येत आहे.
34 आसनी, वातानुकूलित ई - बसचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी (एशियाड) बसेस सारखाच असणार आहे.
या बस मध्ये महिलांना 50 टक्के, 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे.
आरक्षणासाठी www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App या मोबाईल आरक्षण ॲपवर उपलब्ध होणार आहेत.