सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 'नमो ग्रँड सेंट्रल पार्क' चे अनावरण केले.
ठाणे महानगरपालिका आणि कल्पतरू ग्रुप यांच्या सहकार्याने हे उद्यान सुरू केले आहे.
जास्त झाडांमुळे या ठिकाणी वर्षाला अंदाजे 8.84 लाख पौंड ऑक्सिजन निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क आणि लंडनच्या हायड पार्कला प्रेरित होऊन या उद्यानाची उभारणी केली आहे.
25 एकरावरील या उद्यानात 3,500 हून अधिक झाडे आहेत आणि थीम गार्डन्स उपलब्ध आहेत.
भारतातील सर्वात मोठे स्केट पार्क, फिटनेस झोन, मनोरंजनाची जागा तसेच तालुका क्रीडा संकुलचा यात समावेश आहे.
स्नो पार्क आणि जगातील आश्चर्ये दाखवणारे लघु उद्यान विकसित करण्याचीही योजना इथे आखली आहे.
कृषी, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Google सोबत सामंजस्य करार केला.