Chetan Zadpe
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच केवळ एकाच वर्षात पाच भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
वर्षभरात पाच व्यक्तिंना भारतरत्न जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1999 या वर्षी चार भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.
भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना मोदी सरकारकडून भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आमच्या सरकारचे भाग्य आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
'भारत सरकार डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना कृषी आणि शेतकरी कल्याणातील उल्लेखनीय योगदानासाठी भारतरत्न देऊन सन्मानित करत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.
जेडीयूचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांनाही याच महिन्यात मोदी सरकारकडून भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले.
भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.