सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त सध्या नागपूरमध्ये आहेत.
हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली.
रेशीमबाग येथे संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्मारकाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली.
'वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आणि विकासाचा ध्यास घेतलेले आमचे हिंदुत्व आहे.', असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हिंदुत्वाचा विचार अंगिकारून शिवसेनेचे मार्गक्रमण पुढे सुरू असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरवर्षी हिवाळी अधिवेशनावेळी ते याठिकाणी आवर्जून भेट देतात, असेही त्यांनी सांगितलं.
आवडते ठिकाण असल्यामुळे त्यांना रेशीम बागेत अलौकिक शांतता आणि सकारात्मक उर्जा मिळते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनिल देशपांडे यांच्याशी संवाद साधला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरतशेठ गोगावले, संजय रायमुलकर आणि ज्ञानराज चौगुले उपस्थित होते.