Rashmi Mane
संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा आरोप करत 141 विरोधी पक्षांच्या खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
141 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधकांनी जोरदार निदर्शने केली.
संसद परिसरातील गांधीजींच्या पुतळ्यासमोर आणि संसदेच्या मकर गेट बाहेर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
जोपर्यंत खासदारांचे निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत विरोधकांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.
13 डिसेंबरला लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केल्याप्रकरणी आतापर्यंत विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन केलेल्या १४१ पैकी 107 लोकसभेचे आणि 34 राज्यसभेचे सदस्य आहेत. या खासदारांना संसदेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मंगळवारी (19 डिसेंबर) रात्री उशिरा लोकसभा सचिवालयाने एक परिपत्रक काढून निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीत येण्यास बंदी घालण्यात आली.