सरकारनामा ब्यूरो
एकनाथ शिंदेनी ठाण्यातील कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
यावेळी त्यांनी किसान नगर परिसराला भेट दिली.
श्री अयप्पा स्वामी मंदिरात उत्सव असल्याने एकनाथ शिंदेंनी तिथे जाऊन मनोभावे पूजा केली.
यावेळी मंदिर समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते.
तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने किसान नगर परिसरात एलिव्हेटेड वाहनतळ तयार करण्यात आले आहे.
या वाहनतळाचे नाव श्री समर्थ असून, एकनाथ शिंदेंच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
या एलिव्हेटेड वाहनतळामुळे गर्दी असलेल्या शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांना त्यांची वाहने इथे पार्क करता येणार आहेत.
यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी नगरसेवक आणि किसान नगर विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.