Sunil Kedar : सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा झालेला नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा नेमका काय...?

Deepak Kulkarni

पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा...

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक (NDCC) घोटाळा प्रकरणात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Sunil Kedar | Sarkarnama

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

सुनील केदार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

Sunil Kedar | Sarkarnama

2002 मध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.

Sunil Kedar | Sarkarnama

खटल्यातील मुख्य आरोपीही...

त्यावेळी केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. तेच या खटल्यातील मुख्य आरोपीही आहेत.

Sunil Kedar | Sarkarnama

न्यायालयाने दोषी ठरवले

या घोटाळ्यात केदार यांना नागपूर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरविले होते.

Sunil Kedar | Sarkarnama

तब्बल 22 वर्षांनंतर निकाल

घोटाळा उघडकीस आल्याच्या तब्बल 22 वर्षांनंतर याचा निकाल लागला आहे.

Sunil Kedar | Sarkarnama

तरतुदींचे उल्लंघन करत गुंतवणूक...

नागपूर जिल्हा बँकेच्या रकमेतून 2001-02 मध्ये सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत काही कंपन्यांनी गुंतवणूक करण्यात आली होती. कालांतराने कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले.

Sunil Kedar | Sarkarnama

152 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा

2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 152 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला होता. कोलकाता आणि अहमदाबाद येथील काही कंपन्यांनी बँकेच्या रकमेतून 125 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. 

Sunil Kedar | Sarkarnama

सहा जणांना दोषी ठरविले

न्यायालयाने या प्रकरणी सुनील केदार (तत्कालीन बँक अध्यक्ष), केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तीन रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी ठरविले आहे.

Sunil Kedar | Sarkarnama

Next: IPS अधिकाऱ्यांना युनिफॉर्ममध्ये तुम्ही पाहिलं असेल पण IAS अधिकाऱ्याचा 'ड्रेस कोड' काय असतो माहितीये?

येथे क्लिक करा....