सरकारनामा ब्यूरो
शहनवाज शेख हे मुंबई महानगरपालिकेचे अणुशक्ती नगरमधील प्रभाग क्रमांक १४५ चे माजी नगरसेवक आहेत.
शहानवाज शेख यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
मुख्यमंत्र्यांनी शहानवाज यांचे शिवसेनेत स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
"मुंबईबरोबर अणुशक्ती नगरचा विकास होण्यासाठी त्यांचा पूर्ण हातभार लागेल," असेही शिंदे यांनी सांगितले.
या वेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
"शिवसेना हा सगळ्यांना सोबत घेऊन विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे," असेही शिंदे म्हणाले.