Aslam Shanedivan
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला.
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजितदादांच्या बारामतीमध्ये प्रचार सभा होणार होत्या.
यासाठी ते मुंबईहून विमानाने बारामतीला आले होते. पण विमान लँड करतानाच विमान शेतात कोसळले आणि अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
संपूर्ण राज्यासाठी किंवा राष्ट्रासाठी शोक व्यक्त करण्याचा एक प्रतिकात्मक मार्ग म्हणजे शासकीय दुखवटा
या कालावधीमध्ये राज्यात किंवा देशातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येतो.
या कालावधीमध्ये कोणताही सरकारी कार्यक्रम, घोषणा, मेळावे, सभा, मनोरंजन अथवा करमणुकीचे कार्यक्रम केले जात नाहीत.
अंत्ययात्रे वेळी पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवला जातो, जो अत्यंसंस्कारच्या आधी सन्मानपूर्वक नातेवाईतांकडे सुपूर्द केला जातो. तसेच पोलिस दलाकडून हवेत गोळ्या झाडून सलामी दिली जाते.