Free Laptop Scheme : विजय सरकारचा कल्याणकारी योजनांचा धडाका! आधी नवजात शिशू, मग नववधूंना सोनं; अन् आता विद्यार्थ्यांसाठी 2 हजार कोटींची लॅपटॉप योजना

Aslam Shanedivan

सी. जोसेफ विजय

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपल्या घोषणा पत्राप्रमाणे योजना सुरू केल्या आहेत.

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

‘अण्णन सीर’

नुकताच त्यांनी नवजात शिशूसाठी प्रत्येकी एक ग्रॅम सोन्याची अंगठी आणि नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी भेट देणारी ‘अण्णन सीर’ योजना सुरू केली आहे.

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

'वेत्री लॅपटॉप योजना'

या दोन्ही योजनेनंतर आता विजय सरकारने कॉलेज विद्यार्थ्यांसाठी 'वेत्री लॅपटॉप योजना' लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे.

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

दोन हजार कोटींचा निधी

या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य सरकारने २,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पदवी आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप केले जाणार आहेत.

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

कोणत्या विद्यार्थ्यांना फायदा?

या योजनेअंतर्गत, शासकीय आणि राज्य-अनुदानित महाविद्यालयांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या पदवी आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी पात्र ठरतील

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

यानांही मिळणार लाभ

शिवाय शासकीय किंवा राज्य-अनुदानित संस्थांमध्ये त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही ही योजना विस्तारित केली जाईल.

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

सरकारने नेमके काय म्हटलं आहे

डिजिटल जगात, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप हे एक आवश्यक शैक्षणिक साधन असून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान वाढवण्यासाठी, कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी, ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

रोजगाराच्या संधी

तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार होण्यास 'वेत्री लॅपटॉप योजना' लक्षणीय मदत करेल असेही सरकारचे म्हणणे आहे.

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

काँग्रेसच्या देणग्यांमध्ये दशकातील सर्वात मोठी घसरण; आकडे वाचून बसेल धक्का...

आणखी पाहा