Vijaykumar Dudhale
अनेक वर्षे सत्ता उपभोगण्याची संधी मिळूनही काँग्रेसने महिला सक्षमीकरणासह जनहिताकडे दुर्लक्ष केले. आता हे सावत्र भाऊ महायुती सरकारच्या योजनांची टिंगलटवाळी करीत त्या बंद पाडण्याचा खटाटोप केला. मात्र, महिला, शेतकऱ्यांसह विविध घटकांसाठी सुरू केलेल्या सर्व योजना येत्या काळात सुरू राहतील.
लाडक्या बहिणींसह शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठबळावर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेवर येईल.
लखपती दीदी योजनेतून पहिल्या टप्प्यात राज्यात २५ लाख लखपती दीदी बनल्या असून दुसऱ्या टप्प्यात एक कोटी लखपती दीदी बनवू.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला काँग्रेसने चुनावी जुमला म्हणत ही योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयातही धाव घेतली. मात्र, दोन कोटी २० लाख बहिणींना पैसे दिले. नोव्हेंबरचे पैसेही त्यांच्या खात्यात जमा केले. सावत्र भाऊ व तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या विरोधी महिला नेत्यांना बहिणींचे दुःख समजणार नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला.
काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यानं सांगितलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू. पण, महिलांना पैसे मिळतात, हेच काँग्रेसवाल्यांना बघवत नाही, त्यामुळे विरोधक सत्तेत आले की ही योजना बंद करतील.
विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो आम्ही सत्तेत आलो की, पुढचे पाच वर्षे योजना सुरू राहील, त्यामुळेच तुम्ही विचार करा आणि त्यांना (महाविकास आघाडी) सत्तेत आणून योजना बंद पडायची की आम्हाला सत्तेत आणून योजना सुरु ठेवायची, हे ठरवा.
काही जण म्हणाले, पैसे खात्यातून काढून घेतील. अरे कुठला भाऊ ओवाळणी परत काढून घेतो? का रे शहाण्यांनो...
बळिराजासाठी आम्ही 7.5 एचपीपर्यंतचे मोटारचे बिलं माफ केलं आहे. आमच्या हिंमत होती, आम्ही हे बिलं माफ केले. शून्य रुपयाचे बिलं शेतकऱ्यांना दिले आहे. कोट्यवधी रुपयांची वीजबिलं माफी आम्ही केली आहे.