Rajanand More
कुस्तीपटू म्हणून विनेश फोगाट जगभरात लोकप्रियता मिळवली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरूनही तिच्या कामगिरीने तिने भारतीयांची मने जिंकली.
ऑलिम्पिकमधील धक्क्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती घेत राजकारणात एन्ट्री केली. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवत आता आमदार बनली आहे.
विनेश फोगाट कोट्यधीश आहे. तिच्याकडे जवळपास 35 कोटींहून अधिक संपत्ती आहे. जाहिरात, विविध पुरस्कार तसेच सरकारी वेतनात आदी तिचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.
विनेशकडे महागड्या गाड्याही आहेत. तिच्याकडे सर्वात महागडी मर्सिडीज ही कार 1.8 कोटींची आहे. तसेच आणखी तीन ते चार महागड्या कार विनेशकडे आहेत.
हरियाणातील खरखौदा येथे विनेशचे दोन कोटींचे घर आहे. तिने आपल्या कमाईतून हे घर बांधले आहे. इथेच ती कुटुंसोबत राहते.
विनेशला कुस्तीतील कामगिरीमुळे भारत सरकारकडून दरवर्षी सहा लाख रुपये वेतन मिळते. पुरस्कारांमधूनही तिने खूप कमाई केली आहे. एका जाहिरातीतून ती लाखो रुपये कमावते. ऑलिम्पिकनंतर तिचा कमाईचा ओघ वाढला आहे.
विनेशने ऑलिम्पिकमध्ये वजन कमी करण्यासाठी डोक्याचे केस कापले आहेत. त्यामुळे तिचा लूक बदलला आहे. पण आता तिने कुस्तीतून निवृत्ती घेतल्याने तिचा लूक पुन्हा बदलू शकतो.
विनेशने कुस्तीतून जगभरात देशाची मान उंचावली आहे. आता ती आमदार बनल्याने तिला मिळणार मान, प्रतिष्ठा दुणावणार आहे.