Vijaykumar Dudhale
पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. या मेळाव्यात 1 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले. योजनेचा लाभ रक्षाबंधनाआधी मिळावा, अशी सरकारची इच्छा होती, त्यानुसार सर्व बहिणींना पैसे मिळाले आहेत.
मला एकच सख्खी बहीण आहे, पण तुमच्या रूपाने मला लाखो बहिणी मिळाल्या आहेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माझ्या बहिणींना यापुढे माहेरपणाला जाताना कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत : एकनाथ शिंदे
विरोधकांनी या योजनेबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. कुणी या मदतीला लाच म्हणाले, कुणी तुम्ही विकले जाणार का म्हणाले, कुणी कोर्टातही गेले. मात्र, तुमच्या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना जोडा दाखवायला विसरू नका : एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरावेत, त्यांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे लाभ एकत्र मिळतील : एकनाथ शिंदे
राज्यात लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि सावत्र भावांच्या पोटात दुखू लागले. त्यांनी ही योजना बंद पाडण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र त्यांचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडण्यात आले : देवेंद्र फडणवीस
आपले देना बँक सरकार आहे. लेना बँक नाही. मागचे सरकार वसुली सरकार होते. आजपर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले. सर्व महिल्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत : देवेंद्र फडणवीस
येत्या काळात पाच महिन्याचे साडेसात हजार रुपय बहिणींच्या खात्यावर जमा होतील. तुम्ही आमच्या सरकारला पुन्हा संधी दिली तर पुढच्या पाच वर्षांत 90 हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होतील : अजित पवार
हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत, हे पैसे कोणीच काढून घेणार नाही. त्यामुळे विरोधकांकडून पसरवलेल्या अफवांपासून दूर रहा. आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 3 लाख बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत : अजित पवार