Mayur Ratnaparkhe
या बैठकीस उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन होते.
याशिवाय पंजाबचे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची उपस्थिती होती.
बैठकीस हजर असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचाही समावेश होता.
तसेच कर्नाटकमधून उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या बैठकीस हजेरी लावली होती.
ओडिशा काँग्रेस अध्यक्ष भक्तचरण दास यांची बैठकीस हजेरी होती.
शिरोमणी अकाली दलचे कार्यकारी अध्यक्ष बलविंदर भुंडर बैठकीत होते.
भारत राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष के टी रामा राव यांची बीआरएसकडून उपस्थिती होती.
इंडियन युनियन मुस्लिम लीग केरळचे सरचिटणीस पीएमए सलाम हजर होते.
बिजू जनता दलाचे नेते संजय कुमार दास बर्मा हे देखील बैठकीस हजर होते.