Pradeep Pendhare
हाफिजुल हसन अन्सारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आमदार आहेत.
2021 मध्ये त्यांचे वडील हाजी हुसैन अन्सारी यांच्या निधनानंतर ते पहिल्यांदाच पोटनिवडणूक जिंकून आमदार झाले.
राजकारणात येण्यापूर्वी हफिजुल झारखंड राज्य खनिज महामंडळात काही महिने सर्वेक्षक म्हणून सरकारी नोकरी केली.
हाफिजुलने मधुपूरच्या श्यामा प्रसाद मुखर्जी हायस्कूलमधून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
उच्च शिक्षण पटणा इथून घेताना बीआयटी सिंद्रीतून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे.
झारखंड सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सभागृहात मंत्री हाफिजुल मोबाईलवर बोलत होते.
काँग्रेसचे आमदार प्रदीप यादव यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली.
विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी या तक्रारीनंतर मंत्री हाफिजुल हसन यांचा मोबाईल जप्त केला.