सरकारनामा ब्यूरो
शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी.
जोशी हे मूळचे रायगडमधील नांदवी येथील आहेत.
जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून 'एमए' पदवी प्राप्त करून 'एलएलबीमध्ये' शिक्षण घेतले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी पदावर काम केले.
बाळासाहेब ठाकरे यांना भेटल्यावर शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
तरुणांना काम मिळावे, या हेतूने कोहिनूर तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली.
ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या कुलपती पदावर त्यांनी काम केले आहे.
1995मध्ये जोशी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.
2022मध्ये त्यांची भारतीय 'एनएलसी'चे मुख्य संरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.