Roshan More
जम्मू कश्मीर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे क्रिकेट मॅच पाहण्यासाठी कर्नाटकातील हुबळी येथे आले आहे.
रणजी ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटक विरुद्ध जम्मू-कश्मीर असा सामना सुरू आहे.
रणजी ट्राॅफीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे.
आज सामन्याचा अंतिम दिवस असून पहिल्या डाव्यातील आघाडीमुळे जम्मू-काश्मीरचा विजय मिळवला. जम्मू कश्मीरचे हे पहिलेच विजतेपद आहे.
CM ओमर अब्दुल्ला हे स्टेडिअमवर उपस्थित राहून सामना पाहत आहेत. संघ विजय मिळवत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की, जम्मू-कश्मीरचा संघ फायनलमध्ये पोहोचला हाच एक प्रकारे संघाचा विजय होता.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वांना वाटत होते की आम्ही फायनल पोहोचलो आहेत. मात्र, विजय मिळवू शकत नाही. पण आमच्या संघाने सर्वांना चकीत केले आहे.