सतत दांडी मारणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला दणका; 45 दिवसांत 25 रजा...

Rajanand More

IPS आदिती सिंह

IPS आदिती सिंह यांची सध्या देशातील प्रशासनामध्ये जोरदार चर्चा होत आहे. ही चर्चा त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल नव्हे तर वेगळ्याच कारणासाठी सुरू आहे.

IPS Aditi Singh | Sarkarnama

सतत दांड्या

आदिती सिंह हे सातत्याने रजेवर जात असल्याचे समोर आले आहे. जवळपास ४५ दिवसांत त्या तब्बल २५ दिवस रजेवर आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालकांनीच त्यांना दणका दिला आहे.

IPS Aditi Singh | Sarkarnama

जबाबदारी काढली

आदिती सिंह यांच्या सततच्या रजेमुळे वैतागलेल्या पोलीस प्रशासनाने त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविली आहे.

IPS Aditi Singh | Sarkarnama

कोण आहेत आदिती सिंह?

आदिती सिंह या २०२१ च्या तुकडीच्या हिमाचल प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या २०२३ पासून सेवेत सक्रीय आहेत.

IPS Aditi Singh | Sarkarnama

पोलीस अधिक्षक

सध्या त्या स्टेट व्हिजिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरोच्या उत्तर विभागामध्ये पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत.

IPS Aditi Singh | Sarkarnama

मुळच्या यूपीच्या

आदिती सिंह या मुळच्या उत्तर प्रदेशातील कंकरखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील डॉक्टर असून आई ज्योती सिंह या सरकारी नोकरीमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.

IPS Aditi Singh | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

कोरोना काळामध्ये आदिती सिंह यांनी घरीच यूपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात २०२१ मध्ये ६७९ वी रँक मिळवत ही परीक्षा क्रॅक केली.

IPS Aditi Singh | Sarkarnama

विविध जबाबदाऱ्या

पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेशात विविध पदांवर काम केले. अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून त्यांनी पावटासाहिब येथे काम केले आहे. सध्या त्यांच्या रजेची चर्चा सर्वत्र होत आहे.

IPS | Sarkarnama

NEXT : बिहारविषयी कुणी वाईट बोलले तर..! महाराष्ट्रातील IAS देवरेंचा नितीश कुमारांच्या राज्यात दबदबा...

येथे क्लिक करा.