Rashmi Mane
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली सुरू होत असून उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सोपी होणार आहे.
आता रुग्ण किंवा नातेवाईकांना अर्जासाठी धावपळ करावी लागणार नाही. आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर संबंधित रुग्णालयच ऑनलाइन अर्ज सादर करणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून अर्जावर कार्यालयीन 8 तासांच्या आत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे उपचार सुरू होण्यास विलंब होणार नाही.
अर्जाची स्थिती, मंजुरी आणि इतर माहिती एसएमएस व लिंकद्वारे रुग्णांच्या मोबाईलवर रिअल-टाइम उपलब्ध होणार आहे.
अर्ज मंजूर झाल्यानंतर 30 टक्के रक्कम तातडीने दिली जाईल. उर्वरित 70 टक्के निधी अंतिम मंजुरीनंतर रुग्णालयाला वर्ग केला जाईल.
आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि शिधापत्रिकेची ऑनलाइन पडताळणी होणार आहे. पेपरलेस प्रक्रियेमुळे वेळ आणि कागदपत्रांची बचत होईल.
राज्यातील 3000 पेक्षा अधिक सरकारी आणि संलग्न खासगी रुग्णालये या योजनेशी जोडली जाणार आहेत. निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केला जाईल.
मोबाईल अॅपद्वारे जवळचे रुग्णालय, रक्तपेढी आणि रुग्णवाहिका शोधता येणार आहे. 24x7 टोल-फ्री हेल्पलाईन 18001232211, व्हॉट्सअॅप मार्गदर्शन तसेच CSR आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीचाही लाभ मिळणार आहे.