Jagdish Patil
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का देत त्यांचे ६ खासदार फोडले आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण किती बंड झाली आहेत ते जाणून घेऊया.
शिवसेनेतील पहिले बंड छगन भुजबळ यांनी १९९१ मध्ये केलं. त्यांनी १८ आमदारांसह शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षात मनोहर जोशी यांना मिळणारे प्राधान्य आणि बाळासाहेबांनी 'मंडल आयोगा'ला केलेल्या विरोधामुळे भुजबळांनी बंड केल्याचं सांगितलं जातं.
बाळासाहेब ठाकरेंनी गणेश नाईकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर १९९९ त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २००५ साली केलं. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सल्लागारांमुळे आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष सोडला.
त्यानंतर बाळासाहेबांनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर राणेंनी आपल्यासोबत डझनभर आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
चौथे आणि धक्कादायक बंड हे राज ठाकरेंचं होतं. कारण ते बाळासाहेबांचे पुतणे आणि शिवसेनेचे अत्यंत लोकप्रिय नेते होते.
राज यांनी उद्धव यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्याने शिवसेना सोडत 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' या पक्षाची स्थापना केली.
शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेलं पहिलं बंड जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी केलं.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत 'महाविकास आघाडी'चे सरकार स्थापन केले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.
मात्र, या सरकारमध्ये मतदारसंघात निधी मिळत नसल्याची आणि पक्षाने हिंदुत्वाचा अजेंडा सोडल्याची तक्रार करत शिंदेंनी बंड केलं.
शिंदेंनी शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार आणि १८ पैकी १२ खासदार फोडले. या बंडामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर आता जून २०२६ मध्ये पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'च्या नावाखाली शिंदेंनी ठाकरेंचे ६ खासदार फोडले.