Ganesh Sonawane
तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी यांनी स्वतःला राज्यातील मुलांचा 'मामा' म्हणून संबोधले आहे.
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची 'थाईमामन थंगा मोथिराम योजना' (नवजात बालकांसाठी मामाकडून सोन्याची अंगठी) लवकरच अंमलात येणार आहे.
या योजनेनुसार राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बाळाला सोन्याची अंगठी दिली जाणार आहे.
या योजनेच्या अंमल बजावणीसाठी सरकारने वार्षिक ७५५.८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
'तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन'ने (टीएनएमएससी) अंगठ्यांच्या खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत.
निविदेनुसार, २२ कॅरेट सोन्याच्या सुमारे ४.४१ लाख अंगठ्या पुरविण्यासाठी नामांकित सराफांकडून अर्ज मागविले आहेत.
अंगठीसाठी प्रति ग्रॅम १३ हजार रुपये रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
अंगठीची रचना करताना ती नवजात बालकाला टोचणार नाही किंवा इजा होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सरकारच्या सूचना आहेत.
राज्यातील ३८ जिल्ह्यांमधील १०७ शासकीय रुग्णालयांमध्ये या अंगठ्यांचा पुरवठा केला जाणार आहे.