CM विजय यांनी PM मोदींची भेट घेताच 12 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल; काय आहे खास?

Rajanand More

पंतप्रधानांची भेट

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीत भेट घेतली. या दोघांची दिल्लीतील ही पहिलीच भेट ठरली आहे.

CM Vijay with PM Narendra Modi | Sarkarnama

भेटीला महत्व

विजय यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर १८ व्या दिवशी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. देशाच्या राजकारणातील ही भेट महत्वाची मानली जात आहे.

CM Vijay with PM Narendra Modi | Sarkarnama

फोटो व्हायरल

सीएम विजय आणि पंतप्रधानांच्या भेटीनंतर सोशल मीडियात दोघांचा एक जुना फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

CM Vijay with PM Narendra Modi | Sarkarnama

पहिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विजय यांच्या पहिल्या औपचारिक भेटीचा हा फोटो आहे. २०१४ मध्ये कोईम्बतूरमध्ये ही भेट झाली होती.

CM Vijay with PM Narendra Modi | Sarkarnama

लोकसभेचा प्रचार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी अन् विजय यांची भेट झाली होती. त्यावेळी मोदी पंतप्रधान नव्हते. तर विजयही दक्षिणेतील सुपरस्टार होते.

CM Vijay with PM Narendra Modi | Sarkarnama

आता दोघेही मातब्बर

विजय आणि पंतप्रधानांची १२ वर्षांनंतर भेट होत असताना आता दोघेही राजकारणातील मातब्बर आहेत. PM मोदी २०१४ पासून या पंतप्रधान आहेत. तर विजय १८ दिवसांपासून हे मुख्यमंत्री.

CM Vijay with PM Narendra Modi | Sarkarnama

काय घडलं बैठकीत?

विजय यांनी राज्याशी संंबंधित विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान मोदींना दिले. त्यामध्ये वंदे मातरम् चा मुद्दाचाही आहे.

CM Vijay | Sarkarnama

विजय यांची परीक्षा

डीएमकेची सत्ता असताना तमिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारमध्ये नेहमी खटके उडायचे. आता विजय यांना केंद्र सरकारसोबत चांगले संबंध ठेवत विकास साध्य करावा लागणार आहे.

CM Vijay | Sarkarnama

NEXT : महिला IPS अधिकाऱ्याचं 'ते' खळखळून हसणं व्हायरल; काही मिनिटांतच अडकल्या वादात

येथे क्लिक करा.