Jagdish Patil
सध्या सोशल मीडियावर क्रॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही चळवळ सुरु झाली आणि तिला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मात्र, आता याच 'क्रॉक्रोच जनता पार्टी'ची CBI चौकशी केली जावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
राजा चौधरी यांनी कॉक्रोच जनता पार्टी विरोधात ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत कॉक्रोच जनता पार्टी आणि तोतया वकिलांची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तर कोर्टात जो काही उल्लेख झाला त्याचा उपयोग पैसे कमवण्यासाठी केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या याचिकेत काय मुद्दे मांडण्यात आलेत ते जाणून घेऊया. शिवाय ही याचिका कोर्टाने मान्य केल्यास CJP च्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते.
'CJP ने व्यावसायिक उद्देशाने मीम्स वापरत न्यायालयात सादर झालेल्या टिप्पणीचा वापर केला.'
'मूळ संदर्भ खोडून सरन्यायाधीशांचं वक्तव्य सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने दाखवलं.'
एका छोट्या गोष्टीचं रुपांतर चुकीच्या पद्धतीने व्यावसायिक गोष्टीसाठी करण्यात आलं, असे मुद्दे उपस्थित केले आहेत.