Cockroach Janata Party : जे वाटत होतं, तेच घडतंय! फॉलोअर्सवर एकदा नजर टाकाच... देश, वयोगट आला समोर...

Rajanand More

कॉक्रोच जनता पार्टी

कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियात अल्पावधीच रेकॉर्डब्रेक फॉलोअर्स मिळविले आहे. तब्बल इन्स्ट्राग्रामवर तब्बल सव्वा दोन कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

Cockroach-Janta-Party.jpg | Sarkarnama

पाकिस्तानी फॉलोअर्स?

इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक 49 टक्के फॉलोअर्स पाकिस्तानी असल्याचा दावा अनेकांनी सोशल मीडियातून केला आहे.

Pakistan Followers | Sarkarnama

किरेन रिजिजू

या माहितीच्या आधारे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत पाकिस्तान आणि 'जॉर्ज सोरोस टोळी'कडून फॉलोअर्स मिळविणाऱ्या लोकांची मला कीव येते, असे म्हटले आहे.

Kiren Rijiju | Sarkarnama

दीपकेंचा खुलासा

CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रिजिजू यांना प्रत्युत्तर देताना फॉलोअर्सबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Abhijeet Dipke | Sarkarnama

सर्वाधिक भारतीय

दीपके यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, CJP चे तब्बल ९४.७ टक्के फॉलोअर्स हे भारतीय असून १ टक्के फॉलोअर्स अमेरिकन आहेत.

CJP | Sarkarnama

पाकिस्तानी अत्यल्प

फॉलोअर्समध्ये अमेरिकेखालोखाल इंग्लंड, कॅनडा आणि यूएईमधीलही फॉलोअर्स दिसत आहे. या व्हिडीओनुसार पाकिस्तानी फॉलोअर्सचा आकडा १ टक्केही नाही, असे स्पष्ट होते.

CJP | Sarkarnama

वयोगट कोणता?

वयोगटानुसार विचार केला तर २५ ते ३४ वर्षे वयोगटातील सर्वाधिक फॉलोअर्स असून हा आकडा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

Cockroach Janta Party | Sarkarnama

Gen Z

१८ ते २४ वयोगटातील २९.५ टक्के फॉलोअर्स आहेत. या आकडेवारीनुसार Gen Z चा सीजेपीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.

CJP | Sarkarnama

NEXT : तब्बल 2 कोटी फॉलोअर्स असलेली कॉक्रोच जनता पार्टी फक्त तिघांनाच करते फॉलो; कोण आहेत ते?

येथे क्लिक करा.