Rajanand More
सोशल मीडियात धुमाकुळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २२ मे) CJP चे इन्स्टाग्रामवर तब्बल २ कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
देशातील बेरोजगारीसह विविध मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हे अनोखे डिजिटल आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सीजेपी म्हणजे कोणताही राजकीय पक्ष नसून एक डिजिटल व्यासपीठ आहे.
अल्पावधीतच कोट्यवधी फॉलोअर्सच्या गळ्यातील ताईत बनलेली सीजेपी इन्स्टाग्रामवर केवळ तिघांनाच फॉलो करते. कोण आहे हे तिघे, हे पाहूयात.
सीजेपीकडून अभिजीत दीपके, मेघनाद आणि अर्पित शर्मा या तीन अकाऊंटला फॉलो केले जात आहे. दीपके हे सीजेपीचे संस्थापक आहेत.
सोशल मीडियात मेघनाद नावही प्रसिध्द आहे. इन्स्टाग्रामच्या बायकोमध्ये त्यांनी डिजिटल क्रिएटर असे लिहिले आहे. त्यांचे यूट्यूब चॅनलही आहे.
अप्रिल शर्मा यांचेही इन्स्टाग्रामवर सुमारे दहा लाख फॉलोअर्स आहेत. अॅक्सिडेंटल चार्टर्ड अकाऊटंट असे त्यांनी आपल्या बायोमध्ये लिहिले आहे. प्रामुख्याने सरकारचे निर्णय, धोरणांवर टीका करणारे त्यांचे व्हिडिओ आहेत.
प्रामुख्याने युवकांमध्ये मेघनाद आणि अर्पित शर्मा यांचे आकर्षण असल्याचे दिसते. ते विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर पॉडकास्ट करत त्याकडे लक्ष वेधून घेतात. त्याला चांगला प्रतिसादही मिळतो.
कोट्यवधी फॉलोअर्स असूनही दीपके यांच्याकडून त्यांच्याव्यतिरिक्त केवळ अन्य दोघांनाच फॉलो केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोघांची निवड त्यांनी का केली, याबाबतही उत्सुकता आहे.