Rajanand More
तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायोनी घोष पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांची भाषणे चांगलीच गाजली होती.
भाजपने तृणमूलचे नेते व माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या ४३ प्रॉपर्टी असल्याचा दावा करत त्याची यादीच जाहीर केली आहे.
कथित प्रॉपर्टीपैकी एका फ्लॅटच्या मालकांमध्ये अभिषेक यांच्यासह सयोनी घोष असे नावही यादीत आहे. त्यावरून या महिला खासदार सायोनी घोष असल्याचा दावा केला जात आहे.
खासदार घोष यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ती सयोनी घोष आपण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मालमत्तेची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे. कोणतेही पुरावे नसताना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करणे थांबवा, असे घोष म्हणाल्या आहेत.
खोटी माहिती पसरवणाऱ्यां विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा घोषण यांनी दिला आहे. ही 'घोष' दबावाला बळी पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.
सायोनी घोष या राजकारणात येण्याआधी चित्रपटसृष्टीत सक्रीय होत्या. त्यामुळे तरुणाई त्यांची चांगलीच क्रेझ आहे. २०२४ मध्ये त्या पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या.
अभिषेक बॅनर्जी यांनीच सायोनी यांना राजकारणात आणले आहे. सायोनी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करताच त्यांना युवा तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले होते.