New Political Party: 'कॉक्रोच जनता पार्टी'नंतर आणखी एका नव्या पक्षाची राजकारणात दमदार एन्ट्री, झपाट्यानं वाढताहेत फॉलोअर्स

Deepak Kulkarni

सोशल मीडियावर धुमाकूळ

देशभरात कॉक्रोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घातल्याचं दिसून येत आहे.

Cockroach Janta Party | Sarkarnama

तरुणाईमध्ये क्रेझ

सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानानंतर निर्माण झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीची तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे.

Cockroach Janta Party | Sarkarnama

21 मिलियन

अभिजीत दिपके या तरुणानं 'सीजीपी'च्या माध्यमातून सोशल मीडियावर जवळपास 21 मिलियन फॉलोअर्स एकत्र जोडले आहेत.

Abhijeet Dipke | Sarkarnama

पाकिस्तानमध्ये कॉक्रोच पार्टी

भारतात स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा भारतातच नव्हे,तर जगभरातही होताना दिसून येत आहे. त्याच धर्तीवर आता पाकिस्तानमध्ये कॉक्रोच अवामी पार्टी (CAP) आणि कॉक्रोच अवामी लीग (CAL) ची या नव्या पक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

Cockroach-Janta-Party Cockroach Awamy Party | Sarkarnama

पाकिस्तानकडून 'कॉपी'

नव्या कॉक्रोच पक्षाचे सोशल मीडिया पेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारताला नेहमी कॉपी करणाऱ्या पाकिस्तानने आताही तेच केलं आहे.

Cockroach-Janta-Party Cockroach Awamy Party | Sarkarnama

झपाट्यानं फॉलोअर्समध्ये वाढ

पाकिस्तानमधील या पार्टीला देखील नागरिकांसह तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय,कारण झपाट्यानं या पार्टीच्या फॉलोअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

Cockroach-Janta-Party Cockroach Awamy Party | Sarkarnama

तीव्र संतापाची लाट

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तरुणाईला झुरळाची संबोधले होते. यानंतर तरुणाईमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.

Cockroach-Janta-Party Cockroach Awamy Party | Sarkarnama

तरुणपिढीचा नवा इतिहास

यानंतर पेटलेल्या तरुणपिढीनं नवा इतिहास घडवला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दीपके नावाच्या मराठी तरुणानं सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी क्रॉकोच जनता पार्टीची स्थापना केली.

Cockroach-Janta-Party Cockroach Awamy Party | Sarjarnama

डिजिटल चळवळ

सीजीपी हा कोणताही अधिकृत किंवा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष नसून केवळ तरुणांनी उभी केलेली एक डिजिटल चळवळ आहे.

Cockroach-Janta-Party Cockroach Awamy Party | Sarkarnama

युवकांचा देश

युवकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात तरुणांचा अपमानित केलं तर काय होऊ शकतं, याचा प्रत्यय कॉक्रोच जनता पार्टीच्या दिवसागणिक वाढत चाललेल्या डिजिटल चळवळीतून समोर आलं आहे.

Cockroach-Janta-Party-Cockroach-Awamy-Party | Sarkarnama

NEXT: तुटवडा संपताच गॅस एजन्सी चालू करण्याची प्रोसेस पुन्हा सुरु होणार? जाणून घ्या अटी अन् रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रोसेस!

LPG-cylinder-production-India.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...